Issue arised : दिनांक २ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीवर आदळले आणि किनारपट्टीवरील व जवळील गावामध्ये खास करुन दापोली मुर्डी अंजला, केळशी येथील नारळ, पोफळी, आंब्याच्या बागा जवळजवळ नष्ट झाल्या. अनेक वस्त्यांमध्ये घरावर छप्पर शिल्लक राहिले नाही व त्याबरोबर पावसाच्या थैमानामुळे घरातील चीझवस्तूंचे भीषण नुकसान झाले.
Work Approach : झालेल्या नुकसानाने मन विषण्ण झाले व मनात विचार आला की आपण काय करु शकतो? कारण २३ मार्च ला लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मी ( वय ८२) घराबाहेर पडू शकत नव्हतो. One Man Army रा. स्व. संघाने आयुष्याला पुरुन उरेल अश्या काही सवयी लावल्या आहेत. त्यात महत्त्वाची म्हणजे स्वयंशिस्त व सामुहिक शिस्त राष्ट्र फक्त सैन्यावर चालत नाही. राष्ट्रातला प्रत्येक घटक हा सैनिक असतो व त्यामुळेच मी काय करू शकतो याचे उत्तर मला मिळाले. पैरों में यदि जान हो तो मंजिल दूर नहीं और दिल में यदि स्थान हो तो अपने दूर नहीं ...!
माझ्या व्यावसायिक संबंधामुळे व वैयक्तिक परिचयामुळे पुष्कळ लोकांपर्यंत पोहोचता येईल असे मनात आलेलं व सुरुवात छान झाली. माझे मित्र श्री. नितीन कर्वे यांनी त्वरीत रु.१ लाख देण्याचे मान्य केले व परत विनंती केल्यावर परत मदत केली.
Nature of Support : प्रथम, अत्यावश्यक वस्तू पाठवल्या गेल्या. घर शाकारणी साठी पत्रे ६०० नग, चादरी २००, सोलर लॅम्प ५०, पडलेली झाडे कापण्यासाठी पेट्रोलवर चालणारी करवत, कांदे, बटाटे, कणिक १,००० किलो, पाणी सुमारे ३,००० बाटल्या, १५,००० ग्लुको बिस्कीटांचे छोटे पुडे व ३,००० पाकिटे ( एका पाकिटात ३ ठेपले आणि लोणच्याची फोड ) पाल्यातील आणि सहकारी सोसायटीतील भगिनींनी बनवून दिली. काही पाकिटे लोकमान्य सेवा संघ या संस्थेने तयार करुन पाठविली. ही ठेपल्यांची पाकीटे हर्णे येथील कोळीवाड्यात तसेच जनकल्याण समितीचे कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जे रोज स्थानिक पातळीवर काम करत आहेत त्यांना वाटली.
Special Thanks : श्री. अभिजीत सामंत, श्रीमती उज्ज्वला मोडक , श्रीमती शेफाली परांजपे , प्रिती पटवर्धन, दापोली येथील जनकल्याण समिती, ओंकार पाठक, सौरभ मोडक, श्रीराम महाजन, केदार साठे, श्री. विजय गोळे, श्री. अनिश पटवर्धन. 'सेवा सहयोग फाऊंडेशन' मुंबई या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. संजय हेगडे व पार्ले पूर्व येथील श्री. सुबोध जोशी यांनी फार मोलाचे सहकार्य केले. सगळे आपल्या सहकार्यामुळे शक्य झाले.
मी जुलै 2009 पासून माझे व्यवसाय बंधु श्रीनिवास गोगटे यांच्या श्री चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे रत्नागिरी ते पावस सुमारे 18 किलोमीटर च्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्याच्या कार्यक्रमाशी निगडीत आहे. माझ्या फार वर्षापासून एक विचार मनात होता की प्रचंड प्रमाणात उपयुक्त , पंथस्तांना सावली देणारी, पक्ष्यांना घर देणारी व वातावरण शुध्द राखणारी तसेच औषधी असणारी झाडे लावली जावीत.
7 जुलै 2009 ला पहिले झाड लावण्याची सुरुवात झाली व आज रोजी हया झाडांची संख्या सुमारे 900 आहे. एकुण झाडे लावण्याचा संकल्प सुमारे 2500 झाडांचा आहे. 900 पैकी काहींना आता पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्याची वाढ फारच चांगली आहे. आतापर्यंत स्वप्नातील झाडे व त्यांची फळे त्यावर बसणारे पक्षी हे आज प्रत्यक्ष पहायला मिळाले. प्रकल्पाची जागा जिथे झाडे लावली जात आहेत तेथे जांभा दगडच आहे सर्व ठिकाणी थोडी माती असण्याची शक्यता. 3.5 फुट [लांबी]x3.5फुट [रुंदी] x3.5फुट [खोली] असा खड्डा जांभ्या दगडावर व्हायब्रेटरने मारावयाचा त्यात माती व थोडे खत घालुन पिट तयार केले जाते व तेथे झाड लावले जाते व त्याला सुरक्षेसाठी जांभ्या तांबडया दगडाचा चौकोनी पार तयार केला जातो. शिवाय या खडयात झाड लावण्या बरोबर दोन बाजूला पाणी कमी प्रमाणात पुरावे म्हणून दोन छिद्र असलेली मडकी पुरली जातात. झाडांविषयी आस्था असलेल्या व्यक्ति कडून सुरुवातीला रु.2500 एका झाडाचा खर्च म्हणून घेतला व आता साधारण थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत व्हि. पी. बेडेकर & सन्स, यु.एस.व्ही.व्हिटॅमिन्स, प्रयोग ट्रस्ट, श्री. दिपक घैसास यांची आशालता ट्रस्ट व इतर असंख्य व्यक्तिंनी आपणाहून पैसे पाठविले.
झाडे लावण्यापासूनच उन्हाळयामध्ये या झाडांना पाणी घालणे हे जिकिरीचे काम होते. अशा परिस्थितीवर मात करीत गेली 5 वर्षे झाडे लावणे व झाडांना पाणी वाढवणे हा उदयोग घालून चालू आहे सुरुवातीलाच हया झाडे लावण्याच्या कार्यक्रमालाच जेवढी काळजी घ्यावयाला पाहिजे तेवढी श्री. श्रीनिवास गोगटे यांनी प्रकल्पाचे सल्लागार व पर्यावरण तज्ज्ञ डॉ. रमेश मडव यांनी घेतली आहे मुख्य म्हणजे रस्ते व पाटबंधारे खाते, महाराष्ट्र राज्य यांचे कडून रीतसर परवानगी घेतली आहे व झाडे लावताना त्यांनी सांगितलेले सर्व नियम पाळून मगच कामाला सुरुवात झाली. समाधान एवढेच अजून "एकला चलो रे" तालावर स्वार होऊन हा प्रकल्प जोराने चालू आहे हेच महत्वाचे.
I believe that Students are Nation's future. So, Student empowerment is a key factor for national integration. I feel content today about contributing my bit to the noble cause.